Rajasthan Minor Rape : जोधपूर (राजस्थान) येथे मंदिराबाहेर बालिकेचे अपहरण करून बलात्कार !
जोधपूर (राजस्थान) – येथील एका मंदिराबाहेर झोपलेल्या एका ३ वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. मूळचे मध्यप्रदेशातील हे गरीब कुटुंब जोधपूरमधील एका झोपडपट्टीत रहाते. हे कुटुंब मध्यरात्री मंदिराबाहेरच झोपले असता त्यांच्या ३ वर्षांच्या मुलीचे कुणी अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. गुंडाळलेल्या फडक्यात ती पहाटे साडेसहा वाजण्याच्या जवळपास सापडली. तेव्हा तिच्या ओठांवर आणि पाठीवर जखमेच्या खुणा होत्या.
साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कुमार यांनी सांगितले की, सी.सी.टी.व्ही. चित्रीकरणामध्ये मध्यरात्री २ वाजण्याच्या जवळपास एक व्यक्ती मुलीला घेऊन जात असल्याचे दिसत आहे. आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न चालू आहे. पीडित मुलीचे वडील कचरा उचलण्याचे काम करतात, तर तिच्या आईला मानसिक त्रास आहे. मुलीला ५ वर्षांचा भाऊही आहे.
संपादकीय भूमिकासरकारने अशांविरुद्ध जलदगती न्यायायलयात खटला चालवून त्यांना फासावरच लटकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! |