Moradabad Nurse Rape Case : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रात्र पाळीवर असलेल्या परिचारिकेवर डॉ. शाहनवाझने केला बलात्कार !
रुग्णालयातील शिपाई जुनैद आणि अन्य एक परिचारिका मेहनाज यांनी केले साहाय्य !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मुरादाबादमध्ये एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरने रात्रपाळी करणार्या एका २० वर्षीय परिचारिकेवर रुग्णालयातच बलात्कार केला. डॉ. शाहनवाझ असे या बलात्कारी डॉक्टरचे नाव असून या कृत्यामध्ये त्याला शिपाई जुनैद आणि अन्य एक परिचारिका मेहनाज यांनी साहाय्य केले. जुनैद आणि मेहनाज यांनी संबंधित परिचारिकेला डॉक्टरांच्या खोलीत ढकलून खोली बाहेरून बंद केली होती. त्यानंतर शाहनवाझने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक करून रुग्णालय सीलबंद केले. ही घटना १७ ऑगस्टच्या रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. १८ ऑगस्टच्या सकाळी पीडितेने ही माहिती कुटुंबियांसह पोलीस ठाणे गाठून पोलिसांना दिली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.
Dr. Shahnawaz rapes a nurse on night duty; Hospital guard Junaid and nurse Mehnaz also arrested for assisting the rapist.
📍Moradabad Uttar Pradesh
A minority in the country but majority in committing heinous crimes.
What’s wrong if the people demand punishing the accused by… pic.twitter.com/B6LQiAOEki
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 20, 2024
तिने रडत रडतच पोलिसांना सांगितले की, ती गेल्या १० महिन्यांपासून ती या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत आहे. काल रात्री मेहनाजने तिला डॉ. शाहनवाझ दूरभाष करत असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसत होते की, तो तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिला आमंत्रित करत आहे. तिने जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर रात्री १२ वाजता जुनैद आला आणि तिला बलपूर्वक डॉक्टरांच्या खोलीत घेऊन गेला. तिला आत ढकलून बाहेरून दरवाजा बंद केला. यानंतर आरोपी डॉक्टरने तिचे कपडे काढण्यास आरंभ केल्यावर तिने साहाय्यासाठी आरडाओरडा केला; मात्र कुणीही तिचे ऐकले नाही. कुणाला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी त्याने पीडितेला दिली.
संपादकीय भूमिका
|