UPSC Lateral Entry : केंद्र सरकारकडून थेट भरतीच्या विज्ञापनावर बंदी !
नवी देहली – केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये थेट भरतीविषयी, म्हणजे ‘लॅटरल एंट्री’विषयी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सहसचिव, संचालक आणि उपसचिव या पदांची भरती करण्याच्या दृष्टीने केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४५ जागांसाठी विज्ञापन प्रसिद्ध केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने ‘लॅटरल एंट्री’च्या या विज्ञापनावर बंदी घातली आहे. या संदर्भात केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहून थेट भरती थांबवण्याचा आदेश दिला आहेे.