Malaysian PM Anwar Ibrahim : सामाजिक माध्यमांत मलेशियाच्या पंतप्रधानविषयी हिंदुविरोधी माहिती प्रसारित !

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम ३ दिवसांच्या भारत दौर्‍यावर !

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम

कुआलालंपूर (मलेशिया) – मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अन्वर बिन इब्राहिम सध्या त्यांच्या ३ दिवसांच्या भारत दौर्‍यावर नवी देहली येथे आले आहेत. मलेशियाचे पंतप्रधान म्हणून इब्राहिम पहिल्यांदाच भारतात आले आहेत. अन्वर इब्राहिम यांच्या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे अन्वर इब्राहिम यांच्या संदर्भात सामाजिक माध्यमांत ते हिंदुविरोधी असल्याची माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे.

१. अन्वर इब्राहिम यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ ते विद्यार्थी असतांना केला. वर्ष १९७१ मध्ये इब्राहिम यांनी मलेशियाच्या मुसलमान युवा चळवळीची स्थापना केली.

२. ऑगस्ट २०२३ मध्ये एका हिंदु तरुणाचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याच्या प्रकरणात अन्वर इब्राहिम यांचे नाव समोर आले होते. क्लांग येथील मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर इब्राहिम यांनी एका हिंदु तरुणाने इस्लाम स्वीकारल्याचा दावा केला होता. त्यावर केवळ त्यांच्या देशातच नव्हे, तर भारतासह अनेक देशांमनी टीका केली होती.

३. जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा झाकीर नाईक भारतातून पसार झाल्यापासून, म्हणजे वर्ष २०१७ पासून मलेशियामध्ये आहे. झाकीर हा पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासमवेत अनेकदा दिसला आहे. झाकीरविरुद्ध भारतात अनेक गंभीर गुन्ह्यांतर्गत खटले चालू असून त्याला पसार घोषित करण्यात आले आहे. सर्व प्रयत्न करूनही झाकीरच्या प्रत्यार्पणात भारताला यश आलेले नाही. मलेशिया सरकारकडून त्याची पाठराखण केली जात आहे.

अन्वर इब्राहिम यांच्यासमवेत झाकीर नाईक

संपादकीय भूमिका

भारतातून पसार झालेला जिहादी झाकीर नाईक मलेशियात असून मलेशिया सरकार त्याची पाठराखण करत आहे, यातच सर्व काही येते !