दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : म्हाडाचे बनावट संकेतस्थळ करणारे २ जण अटकेत !; भोंगा वाजवल्याने रिक्शाचालकाच्या डोक्यात दगड घातला
म्हाडाचे बनावट संकेतस्थळ करणारे २ जण अटकेत !
मुंबई – म्हाडाचे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. (पोलिसांनी अशांकडून सर्व रक्कम वसूल करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक) एकाला नालासोपार्यातून, तर दुसर्याला माहीममधून सायबर पोलिसांनी कह्यात घेतले आहे. यातील १ जण म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत होता.
भोंगा वाजवल्याने रिक्शाचालकाच्या डोक्यात दगड घातला
डोंबिवली – ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाच्या भागातील रस्त्यावरून जातांना पादचार्यांना दूर करण्यासाठी रिक्शाचालकाने भोंगा वाजवला. याचा राग येऊन एका पादचार्याने त्याच्या समवेत वाद घातला आणि मोठा दगड रिक्शाचालक लक्ष्मण चौधरी यांच्या डोक्यात मारला. यात ते गंभीर घायाळ झाले.
संपादकीय भूमिका : समाजातील वाढती हिंसक मनोवृत्ती दर्शवणारी घटना !
भिवंडीत महिलेची हत्या करणारा अटकेत
भिवंडी – तालुक्यात ऑनलाईन जुगाराचे व्यसन लागलेल्या एकाने ७४ वर्षीय महिलेच्या घरातून सोन्याची चोरी करत तिची हत्या केली होती. (ऑनलाईन जुगार खेळण्याचे दुष्परिणाम पहाता पोलीस जुगाराशी संबंधित ‘ॲप’वर बंदी का घालत नाहीत ? – संपाद्क) पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने महिलेचे घरही पेटवून दिले. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी आरोपी अभिमन्यू गुप्ता याला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पाय दाबण्यास नकार दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या !
नागपूर येथील धक्कादायक घटना !
नागपूर – गुंड प्रवृत्तीच्या मुलाने त्याच्या ६२ वर्षे वयाच्या वडिलांना पाय दाबण्यास सांगितले; मात्र वडिलांनी नकार दिला. संतप्त मुलाने वडिलांना शिवीगाळ करत पुष्कळ मारहाण केली. या मारहाणीत घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले; पण आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा कुशलविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
वाघाच्या आक्रमणात गुराख्याचा मृत्यू !
चंद्रपूर – शहराला लागून असलेल्या जंगलातील वाघाने गुराखी मुनिम गुरलावर (वय ४५ वर्षे) यांच्यावर आक्रमण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी २५ शेळ्या घेऊन मुनिम जंगलात गेले होते. सायंकाळी २४ शेळ्या घरी परतल्या; मात्र मुनिम आणि १ शेळी परतले नाहीत. दुसर्या दिवशी जंगलात मुनिम यांचा मृतदेह सापडला. वन विभागाने मुनिम यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य दिले आहे.