भोपाळ (मध्यप्रदेश) येथे दागिन्यांच्या दुकानावर दरोडा घालणार्या दोघांना अटक
एक आरोपी अग्नीवीर योजनेतील सैनिक !
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे भारतीय सैन्यात अग्नीवीर योजनेद्वारे भरती झालेल्या एका सैनिकाने दागिन्यांच्या दुकानात दरोडा घालून ५० लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.
मोहित सिंह बघेल आणि आकाश राय अशी या दोघांची नावे आहेत. मोहित सिंह अग्नीवीर सैनिक असून तो पंजाबमधील पठाणकोट येथे तैनात होता. आकाश राय हा मोहित सिंह याच्या बहिणीचा पती आहे. आकाश राय कर्जबाजारी झाला होता. त्याला पैशांची आवश्यकता होती; म्हणूनच या दोघांनी दरोडा टाकण्याचे षड्यंत्र रचले.