बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान मुलीवर प्रेम करणार्या दलित हिंदु तरुणाची निर्घृण हत्या !
बरेली (उत्तरप्रदेश) – मुसलमान मुलीवर प्रेम केल्याने येथील सूरज नावाच्या दलित हिंदु तरुणाची सूडभावनेने निर्घृण हत्या करण्यात आली. १० ऑगस्ट या दिवशी सूरज त्याच्या मैत्रिणीसमवेत फिरायला गेला होता. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी सूरजला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपींनी सूरजची निर्घृण हत्या केली. १७ ऑगस्ट २०२४ या दिवशी सूरजचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या स्थितीत आढळला. सूरजच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे मुलीचे वडील छुट्टन, भाऊ तस्लीम, इर्शाद हुसेन, अशफाक, रेहमान आणि इतर १०-१५ अज्ञात आरोपी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा बरेलीतील शिशगढ शहरातील रहिवासी होता. सूरजचे मुसलमान तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रकरणाचे अन्वेषण करण्यात येत असून तथ्यांच्या आधारे आरोपींची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. गावातील शांतता बिघडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदु संघटनांनी केली आहे.
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद करणार्या धर्मांध मुसलमान युवकाविरुद्ध हिंदू पोलिसांत तक्रार करण्यासारखा सनदशीर मार्ग अवलंबतात, तर मुसलमान युवतीवर प्रेम करणार्या हिंदु युवकाची धर्मांध मुसलमान थेट हत्या करतात ! तरीही पुरोगामी लोक हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात ! |