सातारा येथे आधुनिक वैद्यांकडून चिकित्सालये बंद ठेवून कोलकाता येथील घटनेचा निषेध !
सातारा, १९ ऑगस्ट (वार्ता.) – कोलकाता येथे ३१ वर्षीय महिला आधुनिक वैद्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या वतीने देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे खासगी रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता. सातारा शहरासह जिल्ह्यातील खासगी आधुनिक वैद्य या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.