सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी पू. रमेश गडकरी (वय ६६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना नमस्कार करणे आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करणे

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

‘२५.५.२०२४ या दिवशी सकाळी उठल्यावर मी खोलीतील गुरुदेवांच्या चरणांच्या छायाचित्राची पूजा केली आणि सद्गुरु राजेंद्रदादांच्या (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या) खोलीत गेलो. तेथे गेल्यावर मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या रूपाचे स्मरण करून सद्गुरु दादांना नमस्कार केला आणि ‘आजच्या दिवशी आशीर्वाद असावेत’, अशी प्रार्थना केली.

२. सद्गुरु राजेंद्रदादांसमोर बसून त्यांच्याशी बोलत असतांना मला त्यांच्याकडून गुरुदेवांच्या चैतन्याची स्पंदने येत असल्याचे जाणवत होते. त्या वेळी माझे मन शांत आणि निर्विचार होते.

पू. रमेश गडकरी

३. थोड्या वेळाने त्यांच्या उजव्या बाजूला त्यांच्या पत्नी (सौ. मीनल राजेंद्र शिंदे) येऊन बसल्या. तेव्हा अकस्मात् सद्गुरु दादांकडून येणार्‍या गुरुदेवांच्या चैतन्याच्या स्पंदनांमध्ये पालट होऊन शक्तीची स्पंदने जाणवू लागली.

४. गुरुदेवांची मानसपूजा करतांना आलेली अनुभूती

सद्गुरु दादांकडून परत आल्यावर मी गुरुदेवांची मानसपूजा केली. मी त्यांच्या चरणांवर पाणी घालत असतांना मला ‘माझ्या चरणांवरच पाणी पडत आहे’, असे जाणवले. मी डोळे उघडून बघितले; पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते. मी परत डोळे मिटले. तेव्हा ‘मी माझ्या हृदयात असलेल्या गुरुदेवांच्या चरणांवर पाणी घालत होतो आणि ते पाणी माझ्या चरणांवर आले आहे’, असे मला जाणवले.’

– (पू.) रमेश गडकरी (११.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक