राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यावर प्रत्येक महिन्याला ३ सहस्र रुपये देऊ ! – मुख्यमंत्री
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’
सातारा – ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या अंतर्गत राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल, तसतशी प्रत्येक महिन्याला मिळणारी दीड सहस्र रुपयांची रक्कम वाढवून ३ सहस्र रुपयांपर्यंत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले. सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी १७ ऑगस्ट हा दिवस ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण दिवस’ म्हणून ‘आपण सर्वांनी साजरा करूया आणि या योजनेचे स्मरण सदैव ठेवूया’, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.