तीर्थक्षेत्र आळंदी येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणार्या कर्मचार्याला अटक !
आळंदी (जिल्हा पुणे) – तीर्थक्षेत्र आळंदी येथील अनाथ मुलांच्या निवासी संस्थेत देखरेख ठेवणार्या कर्मचार्याने १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलाने आळंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी कर्मचारी व्यंकटेश माळनूर याला अटक केली आहे. पीडित मुलगा त्या संस्थेत निवास करत असून बाहेर एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. १७ ऑगस्टला पहाटे ५ वाजता आरोपीने मुलाला उठवून एका खोलीत नेले. तिथे मुलाला भ्रमणभाष पहायला देऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. आळंदी पोलीस याविषयी अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भुमिकासमाजाचे होत असलेले नैतिक अध:पतन रोखण्यासाठी धर्मशिक्षण देणे हाच पर्याय ! |