दर्यापूर (अमरावती) येथे सकल हिंदु समाजाचा भव्य हिंदु आक्रोश मोर्चा !
दर्यापूर (अमरावती) – बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत यांसह विविध मागण्यांसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने येथे भव्य हिंदु जनआक्रोश मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. बांगलादेशातील अराजक परिस्थितीत हिंदूंचे रक्षण होण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या.
या वेळी धर्मप्रेमींनी हातात फलक आणि भगवे झेंडे घेऊन, तसेच भगव्या टोप्या घालून प्रबोधन अन् जागृती केली. या वेळी ‘बांगलादेशातील हिंदूंना न्याय द्या’ असे जागृतीपर फलक धरण्यात आले होते. मोर्चानंतर सकल हिंदु समाजाच्या वतीने दर्यापूर तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.