Canada Khalistani : खलिस्तान्यांनी दिली ‘भारतीय हिंदूंनो परत जा’, अशी घोषणा !
|
टोरंटो (कॅनडा) – कॅनडातील हिंदुद्वेष्ट्या जस्टिन ट्रुडो सरकारच्या संरक्षणात खलिस्तानी सातत्याने भारतविरोधी कारवाया करत आहेत. १८ ऑगस्टला येथे भारतियांनी आयोजित केलेल्या ‘इंडिया डे परेड’ या कार्यक्रमातही खलिस्तानी आतंकवाद्यांनी तणाव निर्माण केला. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या वेळी खलिस्तान्यांचा धोका लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. असे असतांनाही खलिस्तान्यांनी ‘भारतीय हिंदू, गो बॅक इंडिया’ आणि ‘ना हिंदी ना हिंदुस्तान, बनके रहेगा खलिस्तान’ अशा घोषणा दिल्या. या वेळी खलिस्तान्यांनी भारतीय ध्वजाचाही अवमान केला. एका व्हिडिओमध्ये खलिस्तानी लोक भारतीय ध्वज पायाने तुडवतांना दिसत आहेत. दुसर्या एका व्हिडिओमध्ये खलिस्तानी भारताचा राष्ट्रध्वज फाडत असल्याचे, तर कॅनडाचे पोलीस हे सर्व निमूटपणे पहात असल्याचे दिसत आहे. या फेरीमध्ये भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व करणार्या अनेक देखाव्यांचाही समावेश होता.
‘Indian Hindus, go back’ slogans chanted by #Khalistanis as they disrupt the India Day Parade in #Canada
Indian flag desecrated and trampled underfoot
Why isn’t the Central Government severing all ties with the anti-India Canada and teaching them a lesson?
When will the… pic.twitter.com/XcebNpYVoI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 19, 2024
या वेळी फेरीमध्ये सहभागी भारतियांनी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देत खलिस्तानी फुटीरतावाद्यांना प्रत्युत्तर दिले. एका ठिकाणी दोन्ही बाजू समोरासमोर आल्याने हाणामारी झाली. खलिस्तान्यांनी आधीच फेरीला विरोध करण्याचे षड्यंत्र आखले होते.
संपादकीय भूमिका
|