हिंदु युवतीला त्रास देणार्या मोहसीन मुल्लाणीला पोलिसांनी कह्यात घेतले !
कोल्हापूर – लक्षतीर्थ वसाहत येथील १० वीत शिकणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला त्रास देणार्या मोहसीन तथा बबलू मुल्लाणीला लक्ष्मीपुरी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. मोहसीन गेले १५ दिवस त्या मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. प्रारंभी ही गोष्ट विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना समजली, तेव्हा ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमले आणि पोलिसांना ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले.
दुसर्या एका प्रकरणात कुरुंदवाड येथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी युनूस गौस मुजावर याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली आहे. त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पीडित मुलीची खासगी रुग्णालयात प्रसूती झाली असून तिने मुलीला जन्म दिला आहे. या संदर्भात पीडित युवतीनेच तक्रार दिली आहे. (अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास त्यात आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
संपादकीय भुमिका
|