देवद येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम

१. श्री. देबा दत्ता दास, खारघर, नवी मुंबई.

अ.‘आम्हाला आश्रमातील वातावरण अतिशय शांत वाटले. येथील परिसर अतिशय स्वच्छ, नीटनेटका आणि अत्यंत व्यवस्थित आहे.

आ. आम्हाला सनातन धर्माबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे.’

२. श्री. हेमंत दिलीप गाडे, चेंबूर, मुंबई.

अ. ‘सनातन आश्रमात आल्यावर माझ्या मनाला प्रसन्नता जाणवली. मला वाटले, ‘जणू काही मी एखाद्या मंदिरातच आलो आहे.’

आ. येथील साधकांचे विचार अतिशय चांगले आहेत. ते सर्वाेत्तम कार्य करत आहेत. त्यांना पाहून मी हिंदु असल्याचा मला अभिमान वाटला.

इ. मला येथे पुनःपुन्हा येण्याची इच्छा आहे.’

३. श्री. अजयकुमार रामशकल चौधरी, चेंबूर, मुंबई.

अ. ‘मला सनातनचा आश्रम पाहून पुष्कळ आनंद झाला आणि माझे मन प्रसन्न झाले.

आ. आश्रमाविषयी लिहिण्यासारखे पुष्कळ आहे; परंतु समयमर्यादेमुळे मला ते शक्य नाही.

इ. दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे जनजागृती होत आहे. मलाही ‘हिंदु धर्मासाठी असेच कार्य करावे’, असे वाटते.

ई. मला आश्रमात येण्याची संधी देऊन मला सन्मानित केल्यासारखे वाटले. मला भविष्यातही पुन्हा या आश्रमात यायला आवडेल.’