संपादकीय : अल्पवयीन धर्मांधांची आक्रमकता !
उदयपूर (राजस्थान) येथील भटियानी चौहट्टामधील सरकारी शाळेत एका धर्मांध अल्पवयीन मुलाने शाळेतीलच अन्य एका हिंदु अल्पवयीन मुलावर चाकूचे वार करून त्याला गंभीररित्या घायाळ केले. घायाळ झालेला मुलगा सध्या अतीदक्षता विभागात उपचार घेत आहे. त्यांच्यातील वादाचे कारण स्पष्ट झालेले नसले, तरी शालेय विद्यार्थी शाळेत चाकू घेऊन येतो, हे अधिक गंभीर आहे. त्यामुळे यापुढे शाळा प्रशासनाला, शिक्षकांना विद्यार्थ्यांनी शाळेत येतांना समवेत काही शस्त्र किंवा अपाय करू शकणारे हत्यार आणलेले नाही ना ? हेसुद्धा पडताळावे लागेल कि काय ? अशी स्थिती आहे. आज चाकू आणला, तर उद्या कुणी धर्मांध मुलगा बंदूक किंवा रायफलही आणेल. त्यामुळे अधिक हानी होण्याची शक्यता आहे. यातून हिंसाचारात धर्मांधांसह त्यांची अल्पवयीन मुलेही मागे नसतात, हे लक्षात येते. उदयपूर येथे हिंदु मुलावर झालेल्या या आक्रमणाचे पडसाद तेथे त्वरितच उमटलेही. उदयपूर येथे हिंदु आणि मुसलमान असे दोन्ही गट रस्त्यावर आले अन् पुढे जे काही घडले, ते आपण जाणतोच.
कायद्याचा धाक हवाच !
राजस्थान येथे जातीय हिंसाचार नवीन नाही. गेल्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्या आक्रमणांचे प्रमाण अधिक होते. संपूर्ण देशाला हादरा देणारी कन्हैयालाल या शिवणकाम करणार्या निष्पाप हिंदूची ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देत २ धर्मांधांनी हत्या केल्याची घटना घडली होती. या २ धर्मांधांना अद्यापही कठोर शिक्षा झालेली नाही. या घटनेची पुनरावृत्ती नंतर देशात ठिकठिकाणी झाली. त्या तुलनेत उदयपूर येथे झालेल्या घटनेत भाजपच्या राज्यातील पोलीस आणि प्रशासन यांनी उत्तरप्रदेशच्या धर्तीवर तत्परतेने पावले उचलत धर्मांध अल्पवयीन मुलाचे अनधिकृत घर बुलडोझर लावून पाडले. अशी त्वरित पावले उचलल्यासच धर्मांध आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर थोडातरी जरब बसू शकेल.
अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देशांमधील काही घटना आपण ऐकलेल्या आहेत. तेथे अल्पवयीन विद्यार्थी शाळेत हातात बंदुका घेऊन येतात आणि थेट गोळीबार करून अनेकांचा जीव घेतात. अमेरिकेसारख्या देशात घरात शस्त्रे ठेवण्याची अनुमती असल्यामुळे पालकांकडे असलेली शस्त्रे मुले पळवतात आणि त्यामुळे मोठ्या दुर्घटना होतात. अशी स्थिती भारतात धर्मांधांविषयी होऊ शकते. हिंदूंकडे तलवारीसारखे शस्त्रही नसते, तो कायद्याचे पालन करत असल्यामुळे घरात अवैधपणे असे शस्त्र ठेवण्याचा तो विचारही करत नाही, तसेच म. गांधी यांची अहिंसा, सहिष्णुता यांविषयीची शिकवण त्याच्यात मुरली असल्यामुळे तो इतरांवर आक्रमण करण्याचाही कधी विचार करत नाही. याउलट जिहाद्यांचे असते. भारतातील काही राज्यांमध्ये तर त्यांनी कितीही गंभीर गुन्हा केला, तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना मोकळे रान मिळते.
हिंसेचे बाळकडू !
काही दिवसांपूर्वी अरब देशांमधील एका शाळेतील लहान मुलांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. या व्हिडिओमध्ये ४ ते ५ वर्षांच्या मुलांचा एक नाटकासारखा खेळ बसवण्यात आला होता. यामध्ये या लहान मुलांपैकी कुणी गायीला कापण्याचा अभिनय खोटा सुरा घेऊन करत होता, कुणी खोटी शस्त्रे घेऊन दुसर्याला मारण्याचा अभिनय करत होती, लहान मुसलमान मुली गायीचे कापलेले मांस शिजवण्याचा अभिनय करत होत्या, म्हणजे बालपणापासूनच त्यांच्या मनावर मारणे वा कापणे, हा (कु)संस्कार केला जात होता. यामुळे थोडे मोठे झाल्यावर आणि तरुण बनल्यावर त्यांना दुसर्यांना मारण्यात, हिंसा करण्यात काही चुकीचे वाटत नाही. तो त्यांच्या प्रकृतीचा भाग बनून जातो. ते जेव्हा हिंसाचार करतात, त्यात आधीच भित्रा आणि सहिष्णु वृत्तीचा हिंदु मात्र मार खातो अन् त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हे नोंदवून जाच होतो तो वेगळाच !
एका वृत्तवाहिनीने उत्तरप्रदेश आणि देहली येथील काही धर्मांध मुलांच्या लघु मुलाखती घेतल्या होत्या. त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी ‘आमचे सरकार आल्यावर योगी आणि मोदी यांचे काही चालणार नाही. दोघे जण इस्लामला धोका आहेत. आमचे राज्य नसल्यामुळे आम्ही सध्या गप्प बसलो आहोत’, अशा स्वरूपाची वक्तव्ये या लहान मुलांची होती. मदरशांमधून अशीच शिकवण दिली जात असल्याने ते बंद करण्याची मागणी सतत होत असते. लहानपणापासूनच मुसलमानांच्या मनात ‘हिंदू काफीर आहेत’, असे सांगून त्यांच्यात हिंदू आणि हिंदूंचे नेते यांच्याविषयी किती द्वेष अन् कट्टरतावाद उत्पन्न करण्यात आला आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ते त्यांच्या धर्मासाठी काहीही करायला सिद्ध होतात. काही पकडलेल्या आतंकवाद्यांच्या बोलण्यात ‘इस्लामसाठी, अल्लाहासाठी काहीही करू’, अशीच भाषा असते. जेव्हा अशी मानसिकता असलेले जिहादी तरुण सर्वसाधारण जीवनात काही पद भूषवतात, कुठे चाकरी करतात, कुठे शिक्षण घेतात, तर त्या ठिकाणी त्यांची धर्मांधता दाखवल्याविना ते रहात नाहीत. काही जण उघडपणे, काही जण दंगली करून, तर काही जण ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार करून अतिशय शांतपणे हिंदूंविरुद्ध उभे ठाकतात.
विदेशाचा विचार केला, तर फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया येथे धर्मांधांकडून तेथील ख्रिस्ती लोकांवर आक्रमणे वाढल्यानंतर या दोन्ही देशांनी वाढलेल्या मशिदी अन् मदरसे बंद करण्याचा सपाटाच चालू केला; कारण मशिदी आणि मदरसा येथेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत मुसलमानांना जिहादचे बाळकडू दिले जात होते. या दोन्ही देशांनी मुसलमानांवर कठोर निर्बंध घालण्यास प्रारंभ केला. अगदी २ दिवसांपूर्वी जर्मनीनेही त्यांच्या देशातील सर्वांत मोठी मशीद बंद केली आहे. जर्मन मुले कुराणाचे वाचन करू लागली आणि ती जर्मनीऐवजी इस्लाम पंथाचे श्रेष्ठत्व सांगू लागली. यामुळे जर्मनीने हा निर्णय घेतला. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांनी ‘आमच्या देशात रहायचे असेल, तर आमचे कायदे पाळावे लागतील, शरीयत कायदा चालणार नाही. आमच्या देशात देशविरोधी कारवाया करणार्या मुसलमानांना थारा नाही. त्यांनी त्वरित देश सोडून निघून जावे’, असा फतवाच काढला आहे. तेथील अनेक मौलवी आणि मौलाना यांना त्यांच्या देशातून हद्दपार करण्यात आले. भारतात घडणार्या दंगलींचे मूळ शोधल्यास ते मदरसे आणि मशिदी यांच्या ठिकाणच्या शिकवणुकीत आढळेल. त्यामुळे आता भारतातही मशिदी आणि मदरसे यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जोपर्यंत धर्मांधांवर कठोर कारवाई केली जात नाही आणि त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले जात नाहीत, तोपर्यंत हिंदूंवरील आक्रमणांच्या घटना थांबणार नाहीत. यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक !
उदयपूर येथील शाळेत धर्मांध मुलांनी हिंदु मुलांवर केलेले हिंसक आक्रमण, हे भविष्यातील संकटाचे दर्शक ! |