सद्गुरु स्वाती खाडये यांना भेट म्हणून मिळालेली श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती जागृत असल्याचे जाणवणे
‘महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हुपारी या गावी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित केली होती. त्या सभेत सद्गुरु स्वाती खाडये या वक्त्या होत्या. तेव्हा तेथील एका व्यक्तीने त्यांना कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती भेट म्हणून दिली. सद्गुरु स्वाती खाडये या जेव्हा जुलै २०२४ मध्ये गोव्यातील रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आल्या, तेव्हा त्यांनी ती मूर्ती त्यांच्या समवेत आणली होती. ती मूर्ती आश्रमातील साधकांना बघायला ठेवली होती. (बाजूचे छायाचित्र पहावे.) मला या मूर्तीची पुढील वैशिष्ट्ये जाणवली.
१. ‘श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती जागृत आहे’, असे जाणवले.
२. श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे समोरून दर्शन घेतांना ‘देवी माझ्याकडे बघत आहे’, असे मला जाणवले. तसेच तेव्हा मला माझ्या अनाहतचक्रावर देवीच्या चैतन्याची स्पंदने जाणवली. तेव्हा ‘देवी मला तिची स्पंदने मिळण्यासाठी (व्यष्टीसाठी) कार्यरत झाली आहे’, असे जाणवले.
३. जेव्हा मी देवीच्या समोर उभे न रहाता माझ्या थोडे डावीकडे सरकून देवीचे ४५ अंश कोनातून दर्शन घेतले, तेव्हा ‘देवीने तिचे डोळे उजवीकडे फिरवले आहेत’, असे मला जाणवले, तसेच जेव्हा मी माझ्या उजवीकडे सरकून देवीचे ४५ अंश कोनातून दर्शन घेतले, तेव्हा ‘देवीने तिचे डोळे डावीकडे फिरवले आहेत’, असे मला जाणवले. यावरून लक्षात आले, ‘कोनातून देवीचे दर्शन घेतांना तिने माझ्याकडे तिची दृष्टी न फिरवता ती समष्टीसाठी कार्यरत झाली !’
या अनुभूतींतून ‘ही श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती व्यष्टीसाठी (दर्शनार्थीसाठी) आणि समष्टीसाठी (समाजासाठी) कशी कार्यरत (जागृत) झाली आहे’, हे लक्षात येते. सद्गुरु स्वाती खाडये यांना ही श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती भेट म्हणून मिळाली आहे आणि सद्गुरु स्वाती खाडये या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे समष्टी कार्य अविरत करत आहेत. ‘सद्गुरु स्वाती खाडये यांच्यामुळे त्यांना भेट म्हणून मिळालेली श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती समष्टीसाठी जागृत झाली आहे’, असे मला जाणवले.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |