अमली पदार्थांचा पुरवठा करणार्या धर्मांधास गुजरात येथून अटक
पुणे अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई !
पुणे – काही दिवसांपूर्वी विश्रांतवाडी भागांतून १ कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले होते. ते विक्रीस पाठवणार्या गुजरातमधील महंमद अस्लम मर्चंट यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाने केली आहे. विश्रांतवाडीतील लोहगाव भागातील एका सदनिकेत कारवाई करून १ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केल्याप्रकरणी ३ जणांना अटक केली होती. याचा मुख्य सूत्रधार म्हणून निमीष आबनावे याचे नाव पुढे आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता गुजरातमधील अमली पदार्थांची विक्री करणारा महंमद मर्चंट याचे नाव अन्वेषणामध्ये उघड झाले. (अमली पदार्थांच्या विरोधात प्रभावी मोहीम राबवून अमली पदार्थांचे संपूर्ण जाळे नष्ट करणे आवश्यक ! – संपादक)
‘मॅफेड्रॉन’चा पुरवठा करणार्या धर्मांधांवर गुन्हा नोंद !
पिंपरी (पुणे) – मुंबईहून अमली पदार्थ घेऊन बाणेर (पुणे) येथे विक्री करणार्या कमलेश सासणे याला पिंपरी-चिंचवड अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ७० सहस्र रुपयांचे २४ ग्रॅम मॅफेड्रॉन आणि २ भ्रमणभाषसंच जप्त केले आहेत. सासणे याने ज्याच्याकडून अमली पदार्थ घेतले, त्या मुंबईतील नदीम शेख याच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. |