नाशिक येथील आंदोलनात अनेक हिंदू घायाळ; प्रशासनाला निवेदन

बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचारांच्या विरोधातील आंदोलन !

नाशिक – बांगलादेशात २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. तेथे झालेल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाज, जिल्हा नाशिक, हिंदु एकता आंदोलन, शिवप्रतिष्ठान, तसेच ठाकरे गट, शिवसेना, भाजप यांच्या संयुक्त सहकार्याने १६ ऑगस्ट या दिवशी येथे भव्य आंदोलन करण्यात आले. या दिवशी ‘नाशिक जिल्हा बंद’चे आवाहन करण्यात आले होते.

आंदोलनाच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत हिंदु घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. एका हिंदुत्वनिष्ठाला मारहाण झाल्यामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या होत होत्या.

आंदोलनानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या संपूर्ण प्रकरणानंतर सर्व हिंदुत्वनिष्ठांनी निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन दिले. या वेळी रिक्शा चालक-मालक संघाचे अध्यक्ष भगवंत पाठक, हिंदु एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी, शिवप्रतिष्ठानचे सागर देशमुख, भाजपचे प्रवीण अलय, सकल हिंदु समाजाचे कैलास पंडित देशमुख, तसेच बजरंग दल, विश्व हिंदु परिषद यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.