पुणे येथील मेजर शंतनू घाटपांडे ‘सेना मेडल’ पुरस्काराने सन्मानित !
पुणे, १८ ऑगस्ट (वार्ता.) – मेजर शंतनू घाटपांडे हे ५/९ गुरखा रायफल्स यांच्या माध्यमातून सैन्यदलाची सेवा करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारत सरकारने ‘शूरता पुरस्कार सेना मेडल(गॅलंट्री)’ देऊन सन्मानित केले आहे.
मणिपूर राज्यामध्ये त्यांनी केलेल्या यशस्वी आतंकवादविरोधी अभियानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. मागील २ वर्षांपासून ते मणिपूर येथे आतंकवादविरोधी अभियानामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत.
मेजर शंतनू घाटपांडे हे ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे जावई आहेत.