महंत रामगिरी महाराजांच्या विरोधात कोंढवा (पुणे) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

महंत रामगिरी महाराज

पुणे – महंमद पैगंबर यांच्याविषयी वक्तव्य केल्याच्या प्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याविषयी अधिवक्ता तौसिफ शेख यांनी तक्रार केली होती.