झाडांवर खिळे ठोकून विज्ञापने करणार्यांवर नवी मुंबई महापालिकेकडून गुन्हे नोंद !
३८ जणांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली
श्री. विजय भोर, नवी मुंबई
नवी मुंबई, १८ ऑगस्ट (वार्ता.) – यापुढे शहरात झाडांना खिळे ठोकून विज्ञापने केल्यास (लावल्यास) संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार अद्यापपर्यंत ३८ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून अद्यापपर्यंत २ जणांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, असे नेरकर यांनी सांगितले. महापालिकेच्या या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे विज्ञापन लावणार्यांवर करणारे गुन्हे नोंदवले जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न करत आहेत.
१. काहींनी फलक, पोस्टर आणि भित्तीपत्रके झाडांवर चिकटवलेली असून विद्युत् रोषणाईही केली आहे. यामुळे झाडांना इजा पोचते, तसेच त्यावर अवलंबून असलेल्या सजिवांवरही त्याचे दुष्परिणाम होतात. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोचून पर्यावरणाची हानी होत आहे. या प्रकरणी वारंवार वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
२. विद्रूपीकरण करणार्यांवर राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार कारवाई होईल. ज्यांनी अशा प्रकारे विज्ञापने लावली, त्यांनी ७ दिवसांमध्ये विज्ञापने काढावीत, अशी नोटीस ३८ आस्थापने, शैक्षणिक संस्था यांना बजावली आहेत.
संपादकीय भूमिकाअशी कारवाई सर्वच ठिकाणच्या महापालिकांच्या प्रशासनाने करायला हवी ! |