मुख्यमंत्र्यांनी बँकेत सुरक्षा पुरवावी !
|
मुंबई – राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या अंतर्गत बर्याच महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे ३ सहस्र रुपये देण्यात आले. खात्यात पैसे जमा झाले का, हे पहाण्यासाठी आणि आधार क्रमांक बँक खात्याला लिंक करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी करत आहेत. यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पत्राद्वारे ‘मुख्यमंत्र्यांनी बँकेत सुरक्षा पुरवावी आणि अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे’, अशी मागणी केली आहे.