प्रेमभाव आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारा फोंडा (गोवा) येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आर्यमन अभिजित नाडकर्णी (वय १५ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आर्यमन नाडकर्णी हा या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२४ मध्ये कु. आर्यमन अभिजित नाडकर्णी याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक)
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. सौ. आरती नाडकर्णी (कु. आर्यमन याची आई), ढवळी, फोंडा, गोवा.
१ अ. ‘कु. आर्यमन स्वतःची कामे तो स्वतःच करतो.
१ आ. ऐकण्याची वृत्ती : एकदा मी चहामध्ये गूळ घालायला विसरले. आर्यमन चहाचा घोट पिऊन म्हणाला, ‘‘आई, चहामध्ये गूळ न घातल्याने तो अगोड लागत आहे.’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘एक दिवस अगोड चहा चालतो. अशा चहाचीपण सवय असली पाहिजे.’’ आर्यमनने माझे म्हणणे ऐकले आणि तो अगोड चहा प्यायला.
१ इ. सात्त्विकतेची आवड : आर्यमन ‘सकाळी उठल्यावर प्रार्थना आणि भूमीवंदन, अंघोळीनंतर देवाला नमस्कार करून श्लोक म्हणणे अन् सूर्याला अर्घ्य देणे, जेवणाच्या आधी प्रार्थना करणे आणि रात्री झोपण्यापूर्वी ‘श्री गुरुदेव दत्त’, हा नामजप लावून ठेवणे’ इत्यादी सर्व कृती न विसरता सातत्याने करत असतो.
१ ई. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : ‘आर्यमनने सांगितलेले एखादे वाक्य पुढे खरे होते’, हे मी ५ – ६ वेळा अनुभवले आहे.
१. एकदा आर्यमन माझ्या गळ्याकडे (विशुद्धचक्राकडे) पाहून म्हणाला, ‘‘काळे दिसत आहे.’’ त्यानंतर काही दिवसांनी मला खोकल्याचा तीव्र त्रास चालू झाला.
२. एकदा आर्यमन माझ्या शरिराभोवती काळे आवरण दिसत असल्याचे सूचित करत होता. नंतर काही दिवसांनी माझ्या दुचाकीला अपघात झाला; मात्र गुरुदेवांच्या कृपेने अपघातात मी आणि आर्यमन थोडक्यात वाचलो.
१ उ. कु. आर्यमन याच्यावर झालेले अनिष्ट शक्तीचे आक्रमण, त्याला झालेले त्रास आणि त्याने अनुभवलेली गुरुकृपा ! : सप्टेंबर २०२२ मध्ये आम्ही श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने मुंबईला गेलो होतो. परतीच्या प्रवासात आर्यमनचे डोके दुखू लागले आणि तो थकून खाली भूमीवर बसला. तेव्हापासून तो नेहमी करत असलेल्या ‘नामजप लिहिणे, प्रार्थना करणे, स्तोत्र म्हणणे’ इत्यादी सर्व कृती बंद पडल्या. त्रास होत असतांना आर्यमन रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रवेश करत नव्हता. त्या वेळी तो आश्रमाच्या प्रवेशद्वारावरच थांबत असे.
आर्यमनला होत असलेले अनिष्ट शक्तींचे त्रास गुरुदेवांच्या कृपेमुळे उणावून तो नामजप करू लागला. सप्टेंबर २०२३ नंतर आर्यमन आश्रमात प्रवेश करू लागला आणि आश्रमातील ध्यानमंदिरात बसून एक घंटा नामजपही करू लागला.
यानंतर एका संतांनी आर्यमनच्या आजीला (श्रीमती गीता प्रभु यांना) सांगितले, ‘‘अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांमुळे आर्यमनचा त्रास वाढला आहे. तो २ वर्षांनी न्यून होईल.’’
२. श्रीमती गीता प्रभु (आर्यमनची आजी (आईची आई), वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. सतर्कता आणि प्रेमभाव : ‘एकदा आम्ही आर्यमनला घेऊन एका नातेवाइकांकडे गेलो होतो. तेव्हा आम्ही ज्या खोलीत बसलो होतो, तिच्या पलीकडील खोलीतून एका आजींच्या खोकण्याचा आवाज आला. त्या आवाजाकडे आमचे लक्ष गेले नाही. तेव्हा आर्यमन म्हणाला, ‘‘त्या आजींना काय होत आहे ?’, ते बघ.’’
२ आ. देवाप्रतीचा भाव : तो ध्यानमंदिरात जपाला बसतो. त्याचा जप पूर्ण झाल्यावर तो देवाला इतका भावपूर्ण साष्टांग नमस्कार घालतो की, त्याच्याकडे बघत रहावेसे वाटते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ३.६.२०२४)
|
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |