रामनाथी येथील आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिरात सहभागी झालेल्या साधिकेला आलेल्या अनुभूती
‘१९ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘साधनावृद्धी शिबिर’ झाले. त्या शिबिरात सहभागी झाल्यावर मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘मी ध्वनीचित्रीकरण कक्षात प्रवेश केल्यावर माझे मन निर्विचार झाले.
२. काही वेळाने माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला.
३. माझ्या डाव्या कानात नाद ऐकू येऊ लागला.
४. श्री. चेतन राजहंस मार्गदर्शन करतांना आलेल्या अनुभूती
शिबिरात ‘सर्व साधक साधनेत कुठे न्यून पडतात ?’, या विषयावर श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४० वर्षे) मार्गदर्शन करत होते. तेव्हा मला त्यांच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दिसत होते आणि ‘ते सगळ्यांना प्रेमाने स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया (टीप) राबवण्याची जाणीव करून देत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा प्रारंभी माझा डावा हात जड होऊन माझे अंगही जड झाले. नंतर माझ्या आनंदामध्ये वाढ होऊन मला हलकेपणा जाणवला.
टीप १ : स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुका सारणीमध्ये लिहून ‘तशी चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी दिवसभरात १० – १२ वेळा मनाला योग्य दृष्टीकोनाच्या सूचना (स्वयंसूचना) देणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, ‘आपल्याच कृपेमुळे मला या अनुभूती आल्या’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. वृंदा सटाणेकर, पुणे (२१.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |