हिंदूंना २४ घंटे दिल्यास उल्हासनगरमधील बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान यांना हाकलून लावू ! – आमदार नितेश राणे, भाजप
उल्हासनगर – मी आमदार म्हणून नाही, तर हिंदु म्हणून तुम्हाला (पोलिसांना) शक्ती देण्यासाठी आलो आहे. उल्हासनगरमध्ये आज काय चालू आहे ?, हे तुम्हाला ठाऊक नाही. उल्हासनगरमध्ये एकेका घरात ४०-४० बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान रहातात. ते कुणाच्या अनुमतीने रहात आहेत ? त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नसल्यामुळे ते राहू शकतात. तुम्ही (पोलिसांनी) आम्हाला केवळ २४ घंटे द्या, आम्ही त्यांना येथून साफ करू, असे विधान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येथे झालेल्या भव्य हिंदु जनआक्रोश मोर्चात केले. येथे झालेल्या हिंदूंच्या धर्मांतराच्या घटनेनंतर सकल हिंदु समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात धर्मांतराच्या घटनांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. ‘उनका अली, हमारा बजरंग बली’ अशी घोषणा देत आमदार राणे यांनी भाषणाला प्रारंभ केला.
If 24 hours time is given to Hindus, we will expel illegal Bangladeshis and Rohingya Mu$lims from Ulhasnagar! – @NiteshNRane BJP MLA
Hindu Jan Akrosh Morcha held in Ulhasnagar#SaveHinduGirls pic.twitter.com/uBBcXMroBc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 18, 2024
ते पुढे म्हणाले,
१. सलीम अन्सारी, बाबा अन्सारी हा आज जिवंत का आहे ? मुलीने धर्मांतर केलेल्या पीडित हिंदु कुटुंबाची भेट घेतली. तिला वडील भेटायला गेले, तर पोलीस सांगतात, ‘तुम्हाला भेटता येणार नाही.’
२. धर्मांतर केलेल्या त्या मुलीच्या घरी हिरवे साप आले आणि त्यांनी तिच्या घरातील मंदिर जाळून टाकले. आज तुम्ही हिंदू म्हणून जागृत राहिला नाहीत, तर तुम्ही पूजाही करू शकणार नाहीत.
३. पोलिसांनो, तुम्हाला सांगतो, ‘हे जिहादी कधीही तुमच्या बाजूने येणार नाहीत. आझाद मैदान येथे रझा अकादमीने काय केले ते आठवा. २ दिवसांपूर्वी नाशिकमध्ये काय झाले ? हिरवे वळवळायला लागले; पण हिंदूंनी त्यांना ताकद दाखवली. दगडफेक त्यांनी केली; पण हिंदूंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
काय आहे प्रकरण ?
काही महिन्यांपूर्वी कुर्ला येथे रहाणार्या कल्पना चौधरी यांची मुलगी दृष्टी चौधरी हिने धर्मांतर केले. या प्रकरणात बनावट कागदपत्रे देऊन धर्मांतर केल्याचा आणि फूस लावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दृष्टी चौधरी आणि सलीम चौधरी अशा दोघांना अटक केली होती. या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.
आमदार नितेश राणे यांनी कल्पना चौधरी आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन समतानगर परिसरातील धर्मांतराच्या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात हिंदु संघटनांनी धर्मांतराच्या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली.