ध्वजारोहणाच्या ठिकाणी म. गांधी आणि आंबेडकर यांच्या छायाचित्रांसमवेत टिपू सुलतानच्या चित्राचे पूजन

कलबुर्गी (कर्नाटक) येथील घटना

कलबुर्गी (कर्नाटक) – येथील हुमनाबाद रिंग रोड जवळच्या रिक्शाचालक संघटनेच्या नेत्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाच्या वेळी म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसमवेत टिपू सुलतानचे चित्र ठेवून त्याचे पूजन त्यांचे केल्याची घटना १५ ऑगस्ट या दिवशी घडली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन टिपूचे चित्र हटवून टाकण्यास सांगितलेे. यावर ‘जर चित्र काढायचेच असेल, तर अन्य २ छायाचित्रेही काढू, केवळ टिपूचे चित्र काढणार नाही,’ असे नेत्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनीच टिपूचे चित्र हटवले. (टिपूचे चित्र लावणार्‍यांना पोलिसांनी अटक करून कारागृहात टाकणे आवश्यक होते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये मुसलमानप्रेमी काँग्रेसचे सरकार असल्यामुळे याहून वेगळे काय घडणार ?