United Nation Bangladesh Hindus: बांगलादेशातील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ६५० लोकांत सर्वाधिक हिंदू ! – संयुक्त राष्ट्र
|
जिनीव्हा (स्वित्झर्लंड) / ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील हिंदुविरोधी हिंसाचारावर अंतत: संयुक्त राष्ट्रांनी तोंड उघडले आहे. संयुक्त राष्ट्रांतील मानवाधिकारांच्या उच्चायुक्तांच्या अहवालात यावर भाष्य करण्यात आले आहे; परंतु हिंदूंवर आक्रमण करणारे कट्टर मुसलमान असल्याचा उल्लेख टाळण्यात आला आहे. या अहवालानुसार १६ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत बांगलादेशातील हिंसाचारात ४०० लोकांचा बळी गेला, तर ५ आणि ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या हिंसाचारात २५० हून अधिक लोक मारले गेले. शेकडो लोक घायाळ झाले आहेत. शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत.
Majority of the 650 people killed in the violence in Bangladesh were Hindus
Action should be taken against the perpetrators of violence – @volker_turk
The @UNHumanRights finally utters a word in favour of Hindus
A team of UN will go to Bangladesh to investigate the incidents… pic.twitter.com/MYu0os8iWX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 19, 2024
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात मांडण्यात आलेली अन्य सूत्रे !
१. १६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालवधीत विद्यार्थी आणि तरुण यांच्या आंदोलनानंतर उसळलेल्या हिंसाचारात ६५० हून अधिक लोकांचा बळी गेला. मृतांमध्ये अल्पसंख्यांक हिंदू सर्वाधिक आहेत.
२. देशभरातील सर्वच रुग्णालये रुग्णांनी भरली असून रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नाही.
३. अधिकार्यांनी रुग्णालयांना माहिती देण्यापसून रोखल्यामुळे मृतांची नेमकी संख्या समजू शकलेली नाही.
४. संरक्षण दलांनी बळाचा अधिक वापर केला.
हिंसाचार करणार्यांवर कारवाई व्हायला हवी ! – वोल्कर तुर्कसंयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकारांचे उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, हिंसाचार करणारे, या हिंसाचारास कारणीभूत असलेले आणि ज्यांच्या दायित्वशून्यतेमुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला, अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास व्हायला हवा. आमचे एक पथक बांगलादेशाला जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. हे पथक हिंसाचाराच्या घटनांचा तपास करेल. |
संपादकीय भूमिकाअसे सांगणारी संयुक्त राष्ट्रे ‘हा हिंसाचार कट्टर मुसलमानांनी केला आहे. तेथील मुसलमान असहिष्णु आहेत. हिंदूंवर सातत्याने अत्याचार करतात’, असे म्हणण्याचे धाडस दाखवत नाहीत. याविषयी आता केंद्र सरकारनेच संयुक्त राष्ट्रांना जाब विचारला पाहिजे ! |