Jaipur Hindu Attack : जयपूर (राजस्थान) येथे क्षुल्लक कारणावरून मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत हिंदु तरुणाचा मृत्यू
पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवल्याचा कुटुंबियांचा आरोप
जयपूर (राजस्थान) – येथे शास्त्रीनगर भागात ई-रिक्शा चालवणार्या मुसलमानांनी दिनेश नावाच्या हिंदु तरुणाला रस्त्यावर केलेल्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. दिनेश दुचाकीवरून त्याचा मित्र जितेंद्रसमवेत जात असतांना त्याचा शाहरुख खान आणि त्याचे मित्र यांच्याशी ई-रिक्शावरून वाद झाला. त्या वेळी शाहरुख आणि त्याच्या मित्रांनी दिनेश याला मारहाण केली. घरी पोचल्यानंतर दिनेशची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना १६ ऑगस्ट या दिवशी घडली. यानंतर पोलिसांनी या परिसरात जमावबंदी आदेश लागू केला.
Hindu youth dies after an assault by Mu$|!ms over a minor issue.
📍Jaipur Rajasthan
Police accused of negligence by the family
Hindus are unsafe in the country and they nor the Government are able to protect them, which is a matter of shame for Hindus#HindusUnderAttack… pic.twitter.com/679zx5XaLp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 18, 2024
दिनेशच्या मृत्यूनंतर १७ ऑगस्टला त्याचे कुटुंबीय आणि मित्र यांनी शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांना जाब विचारला. त्यांनी पोलिसांवर निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप केला. पोलिसांनी शाहरुख याला अटक केली असून त्याच्या मित्रांचा शोध घेतला जात आहे.
संपादकीय भूमिकादेशात हिंदू असुरक्षित असून त्यांचे रक्षण ते स्वतः करू शकत नाही कि कोणते सरकार करत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! |