मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे रणरागिणी समितीची स्थापना !
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – निळे येथील जोतिबा मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी समितीची शाखा स्थापन करण्यात आली. यात निळे आणि बाणेकरवाडी येथील धर्मशिक्षण वर्गांतील युवती अन् महिला यांचा पुढाकार होता. ग्रामदैवत जोतिबा देवाच्या चरणी श्रीफळ वाढवून प्रार्थना करण्यात आली. नंतर समितीच्या फलकाला पुष्पहार घालण्यात आला. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार घातला.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी रणरागिणी शाखेचे महत्त्व सांगितले, तर श्री. रमेश पडवळ यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली. या प्रसंगी निळे येथील प्रतिष्ठित श्री. बाबासाहेब कुंभार, मलकापूर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि व्यावसायिक श्री. रमेश पडवळ, माजी नगराध्यक्ष श्री. उदयसिंह कोकरे देसाई, श्री. मधुकर देसाई, श्री. साहील लाड, सनातन संस्थेचे श्री. सुधाकर मिरजकर, पूजा कुलकर्णी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आणि उद्देश सौ. ऐश्वर्या कोकरे-देसाई यांनी विषद केला.