…अन्यथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाज बंद पाडू ! – बाबा कांबळे, अध्यक्ष, टपरी, हातगाडी पंचायत
‘टपरी, हातगाडी पंचायत’चे अध्यक्ष बाबा कांबळे यांची चेतावणी
पुणे – वर्ष २०१३ च्या सर्वेक्षणानुसार शहरातील सर्व टपरी, पथारी आणि हातगाडीधारकांना १५ दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी परवाना द्या; अन्यथा पिंपरी-चिंचवड महापालिकेला टाळे ठोकून कामकाज बंद पाडू, अशी चेतावणी ‘टपरी, हातगाडी पंचायत’चे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे. टपरी, पथारी आणि हातगाडीधारक यांच्या प्रश्नांवर संघटनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी संघटनेकडून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. पुनर्वसन केल्याविना अतिक्रमण काढू नये, फेरीवाला धोरणाची कार्यवाही करा, त्यांना सामाजिक सुरक्षा द्या इत्यादी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.