‘ज्ञानयोगाच्या लिखाणाचे संगणकीय टंकलेखन आणि संकलन करणे’, या सेवांसाठी ज्ञानयोगाची आवड असणार्यांची आवश्यकता !
साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गेल्या ५० वर्षांपासून अध्यात्म, साधना, धर्म, राष्ट्र यांसारख्या विविध विषयांवरील कात्रणांचा संग्रह करून ठेवलेला आहे. या सर्व कात्रणांमधील निवडक लिखाणाचे संगणकीय टंकलेखन आणि संकलन करण्याची सेवा सनातनचे साधक गेल्या २५ वर्षांपासून अखंड करत आहेत. या कात्रणांमध्ये ज्ञानयोगाच्या संदर्भातीलही बरेच लिखाण आहे. हे लिखाण सर्वसामान्य व्यक्तीला आकलन होणे कठीण आहे. ते ज्ञानयोगाची आवड असणार्यालाच आकलन होऊ शकेल, असे आहे. या लिखाणाचे संगणकीय टंकलेखन आणि संकलन करण्याची सेवा उपलब्ध आहे. ही सेवा करण्यासाठी ज्ञानयोगाची आवड असणार्यांची आवश्यकता आहे. या सेवेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड इत्यादींपैकी कोणत्याही भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ही सेवा करण्यासाठी इच्छुक असणारे सेवा शिकण्यासाठी काही दिवस आश्रमात येऊन राहू शकतात आणि त्यानंतर घरी राहून ही सेवा करू शकतात. या सेवेत सहभागी होऊ इच्छिणार्यांनी पुढील माहिती कळवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’