रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. श्री. उद्धव भानुदास वैरट, निगडी, पुणे, महाराष्ट्र. (खजिनदार, व्यसनमुक्त युवा छावा संघ, महाराष्ट्र राज्य.)
अ. ‘हिंदु संस्कृतीला जाज्वल्य इतिहास आहे. ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होण्यासाठी आपला ‘सनातन आश्रम’ खरोखरच पवित्र आणि पुण्याचे काम कर्तव्यदक्षपणे करत आहे.
आ. आश्रम पाहून ‘हिंदुत्वासाठीचे कार्य कसे चालते ? आणि हिंदुत्वासाठी कार्य कसे करायचे ?’, याची प्रेरणा मिळाली.’
२. श्री. हौसेराव नारायण भोसले, कांबळेश्वर, तालुका बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘मला आश्रम पाहिल्यावर आनंद वाटला.
आ. ‘आश्रमातील सर्व सेवा, स्वच्छता आणि सुखसोयी नियोजनबद्ध कशा आहेत’, हे पहायला मिळाले. हे सर्व पाहिल्यानंतर मन एकदम आनंदी झाले. त्या नियोजनाबद्दल धन्यवाद !’
३. श्री. शिवदत्त राजेंद्र कुंभार, निरावागज, तालुका बारामती, जिल्हा पुणे.
अ. ‘आश्रमात पुष्कळ सात्त्विक आणि आनंददायी वातावरण आहे.
आ. मला आश्रम पाहून पुष्कळ शिकायला मिळाले.
इ. ‘साधनेमध्ये किती शक्ती आहे !’, ते माझ्या लक्षात आले.
ई. माझा हिंदु धर्मात जन्म झाल्याचा मला अभिमान वाटला.’
उ. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन आम्हाला सनातन धर्माची माहिती दिल्याबद्दल आम्ही पुष्कळ आभारी आहोत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.६.२०२४)