बांगलादेशातील हिंदूंच्या सद्य:स्थितीच्या निषेधार्थ सोयगाव (संभाजीनगर) येथे कडकडीत बंद !
मागण्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन !
जळगाव, १७ ऑगस्ट (वार्ता.) – भारत सरकारने बांगलादेशी हिंदु आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, यासाठी १७ ऑगस्ट या दिवशी सोयगाव (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे नायब तहसीलदार निवृत्ती कापसेकर यांना समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच बांगलादेशातील सद्य:स्थितीच्या निषेधार्थ सोयगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. निवेदन देतांना राजकीय पक्ष, वारकरी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.