देश एकसंघ ठेवण्यासाठी धर्माचरण करावे ! – महंत रामगिरी महाराज
सिन्नर (जिल्हा नाशिक) – देश चालवणारे शासनकर्ते देशात सहिष्णु आणि धार्मिक वातावरण निर्माण करून एकमेकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करत असतील, तर तो देश सर्वांगीण विकास करतो. बांगलादेशाचे उदाहरण पहाता धर्माचे पतन झाले, तर भारताचाही बांगलादेश होण्यास वेळ लागणार नाही, अशी चेतावणी महंत रामगिरी महाराज यांनी येथे दिली. शेजारी बांगलादेशात निर्माण झालेली अराजकता डोळ्यांपुढे ठेवावी. धर्म संप्रदायामुळे जनमानसात शांतता आणि सहिष्णुता टिकून रहाते. त्यासाठी प्रत्येकाने हिंदु धर्माच्या नीती-नियमांचे आचरण करावे, असा उपदेशही त्यांनी दिला. पंचाळे येथील गंगागिरी महाराजांच्या नारळी सप्ताहात तिसर्या दिवसाच्या प्रवचनात ते मार्गदर्शन करत होते.
महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, अन्याय करणारा जेवढा दोषी, तेवढाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो. त्यामुळे ‘जशास तसे’ उत्तर दिले नाही, तर आपला बांगलादेश होण्यास वेळ लागणार नाही.