स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान’कडून सनातन वह्यांचे वाटप !
रायगड – देशाच्या ७८ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान’कडून येथील माध्यमिक विद्यालयाच्या अंगणवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक असे १७६ विद्यार्थी, तसेच १५ शिक्षक यांना ‘सनातन संस्थे’च्या संस्कार वह्यांचे वाटप करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला देवस्थानचे मा. अध्यक्ष वामन बोडस, सचिव-खजिनदार सिद्धेश पोवार, विश्वस्त प्रफुल्ल लिडकर, सखाराम जाधव, माध्यमिक विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक आणि सहकारी, रायगड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि सहकारी, हरिहरेश्वर गावाचे माजी सरपंच अमित खोत, उपसरपंच पाटील, सदस्य सचिन गुरव, स्मिता पोवार, पूर्वा भुसाणे, पुलेकर, खोपटकर, सुयोग लांगी, ग्रामपंचायत प्रशासक आंधळे आणि गावातील मान्यवर नागरिक या वेळी उपस्थित होते.
अभिप्राय
१. शारीरिक सुदृढतेसाठी वहीवर उत्तम विचार दिलेले आहेत. त्यांचे पालन केल्यास आपले शरीर उत्तम होण्यास साहाय्य होईल.
– श्री. वामन बोडस, अध्यक्ष, हरिहरेश्वर देवस्थान
२. विद्यार्थ्यांना शालेय आणि धर्मशिक्षण दिल्यास ते आध्यात्मिक होऊ शकतात. त्यांच्यावर चांगले संस्कार होऊन धर्माप्रती आस्था जागृत होईल. अशाने पुढे हिंदु राष्ट्र निर्मितीस साहाय्य होईल.
– श्री. सिद्धेश पोवार, सचिव खजिनदार, हरिहरेश्वर देवस्थान