Sabarmati Express Accident : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे रूळावरून घसरले : जीवितहानी नाही !

रूळावर ठेवण्यात आलेल्या अज्ञात वस्तूमुळे झाला अपघात !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील कानपूर आणि भीमसेन या स्थानकांच्या मध्ये साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे १६ ऑगस्टच्या रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रूळावरून घसरले. या अपघातात कुणीही घायाळ झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली. लोको पायलटने (रेल्वे चालकाने) दिलेल्या माहितीनुसार रूळावरील वस्तूला इंजिनची धडक बसल्यामुळे सदर अपघात झाला. ही एक्सप्रेस वाराणसी-कर्णावती या मार्गावर धावते. या अपघातामुळे या मार्गावरील ७ रेल्वे गाड्या रहित करण्यात आल्या आहेत, तर ३ गाड्या इतर मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

या अपघातामध्ये घातपात आहे का ? याची चौकशी झाली पाहिजे !