Vivek Ramaswamy On Bangladeshi Hindus : बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करून केलेली आक्रमणे चुकीची !

अमेरिकेतील हिंदु नेते रामास्वामी यांचे विधान !

अमेरिकेतील हिंदु नेते रामास्वामी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकी उद्योजक आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे माजी हिंदु उमेदवार विवेक रामास्वामी यांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या आक्रमणांविषयी चिंता व्यक्त केली.

रामास्वामी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करून होणारी आक्रमणे चुकीची आहेत. हे चिंताजनक आहे. पीडितांसाठी केलेल्या आरक्षण व्यवस्थेसाठीही ही चेतावणी आहे.