Mamata Banerjee March : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच मोर्चा काढून दोषींना फाशी देण्याची केली मागणी !
कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण
कोलकाता (बंगाल) – येथील आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांविरोधात राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चात सहस्रो लोक सहभागी झाले होते.
संपादकीय भूमिकामुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोपींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी आरोपींना पाठीशी घालून आता लोकांसमोर अशा प्रकारचे नाटक करत धुळफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे सरकार केंद्र सरकारने विसर्जित करणेच आवश्यक आहे ! |