साधिकेला ‘निर्विचार’ हा नामजप करतांना आलेल्या अनुभूती
१. ‘१४.५.२०२१ या दिवशी ‘निर्विचार’ हा नामजप करतांना आरंभी मला आनंद जाणवत होता.
२. मी ५ – ६ वेळा हा नामजप केल्यानंतर मला डोळ्यांसमोर काही क्षण ‘निर्विचार’ असे लिहिलेले दिसले. नंतर ती अक्षरे मोठी होत गेली.
३. त्यानंतर ‘मी पुष्कळ व्यापक झाले आहे’, असे मला जाणवले.
४. त्या वेळी माझ्या मनात कोणतेच विचार नव्हते. मी नामजपाच्या नावाप्रमाणे निर्विचार स्थिती अनुभवली.
काळानुसार साधकांमध्ये सहजतेने पालट घडवून आणणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती कोटीशः कृतज्ञता !’
– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |