मातंग ऋषींच्या आश्रमाप्रमाणे रामनाथी येथील सनातनचा आश्रम हे गुरु-शिष्य भेटीचे ठिकाण असणे
‘२३.१.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथे सनातनच्या आश्रमात श्रीराम जन्मभूमीच्या संदर्भात एक प्रदर्शन आयोजित केले होते. त्यामध्ये शबरीचे गुरु मातंग ऋषि यांच्या आश्रमाचे प्रतीक म्हणून एक दगड ठेवला होता. तो पाहिल्यावर मी चैतन्याने न्हाऊन निघालो. तेव्हा ‘राक्षसी वृत्तीचा संहार’ हे ध्येय होते. तो गुरु-शिष्य यांच्या भेटीचा योग होता’, असे मला जाणवले. त्याचप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम हे गुरु-शिष्य भेटीचे ठिकाण आहे. येथे संत आणि साधक यांची भेट होते. हे साम्य माझ्या लक्षात आल्यावर माझा आनंद द्विगुणित झाला.’
– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), फोंडा, गोवा. (३०.१.२०२४)