कोल्हापूर येथे व्यापाऱ्याच्या कुटुंबियांना अज्ञाताकडून बंदुकीचा धाक !
कोल्हापूर – शाहूपुरी येथील ४ थी गल्ली येथील व्यापारी संदीप विश्वनाथ नष्टे आणि त्यांच्या कुटुंबियांना अज्ञाताने बंदुकीचा धाक दाखवत धमकी दिली. याविषयी संदीप यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १२ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता साधारणत: ४० वर्षांची व्यक्ती नष्टे यांच्या दारात आली. तिने ‘हे संदीप यांचे घर आहे का ?’, अशी विचारणा करून ती थेट नष्टे यांच्या घरात घुसली. त्याच्या चेहऱ्यावर मास्क असल्याने त्याचा चेहरा ओळखता आला नाही. या संदर्भात पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.