बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

  • हिंदु जनजागृती समितीची मागणी

  • मुंबई शहर निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हा दंडाधिकारी यांना निवेदन 

मुंबई – बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, या विषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले आहे. . मुंबई शहर निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयात जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदन स्वीकारतांना (डावीकडे) उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले

या वेळी सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर, श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी) चे श्री. प्रभाकर भोसले आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार उपस्थित होते.