सात्त्विकतेची ओढ असलेला पनवेल (जिल्हा रायगड) येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्चस्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. राघव सागर म्हात्रे (वय ४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. राघव सागर म्हात्रे हा या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. देवतांची स्तोत्रे म्हणणे आणि नामजपादी उपाय करणे : ‘राघवच्या वेळी गरोदर असतांना मी प्रतिदिन रामरक्षा, मारुतिस्तोत्र, देवीकवच, गणपति अथर्वशीर्ष, दुर्गा सप्तशती आणि हनुमानचालीसा म्हणत असे. मी ‘उदबत्ती, कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे, ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करणे, प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त करणे’ इत्यादी करत असे.’ – सौ. सुरभी सागर म्हात्रे (कु. राघव याची आई), खांदा कॉलनी, पनवेल.
१ आ. जन्माच्या वेळी : ‘ज्या वेळी रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या मंदिरात शंखनाद चालू झाला, त्या वेळी बाळाचा जन्म झाला आणि त्याच्या रडण्याचा आवाज आला. तेव्हा सर्वांच्या अंगावर शहारे आले. मी लगेच देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’ – सौ. विशाखा विष्णुदास म्हात्रे (कु. राघव याची आजी) आणि सौ. सुरभी सागर म्हात्रे, खांदा कॉलनी, पनवेल.
२. जन्मानंतर
अ. ‘राघव त्याच्या जन्मानंतर काही दिवस रात्रीच्या वेळी पुष्कळ रडायचा. त्याला जवळ घेऊन नामजप केल्यावरच तो झोपायचा.’ – सौ. विशाखा विष्णुदास म्हात्रे
आ. ‘काही दिवस राघवला सारख्या उलट्या व्हायच्या आणि तो पुष्कळ रडायचा. तेव्हा माझी आई (राघवची आजी, श्रीमती भारती बिरारी) त्याला घरातील श्रीकृष्णाच्या चित्राजवळ न्यायची. त्या चित्राकडे पाहिल्यावर त्याचे रडणे थांबायचे आणि तो हसू लागायचा.
३. जन्म ते १ वर्ष
३ अ. सात्त्विकतेची ओढ
१. १६.४.२०१९ या दिवशी मी आणि माझी आई राघवला घेऊन पू. (सौ.) संगीता पाटील (सनातनच्या २५ व्या संत, वय ६४ वर्षे) यांच्या दर्शनासाठी भोसरी (पुणे) येथे गेलो होतो. तिथे असतांना तो शांत होता. निघायच्या वेळी तो रडू लागला. तेव्हा ‘त्याला तिथून जायचे नव्हते’, असे मला वाटले.’
– सौ. सुरभी सागर म्हात्रे
२. ‘खाऊ खायच्या वेळी कृष्णाचा श्लोक म्हणायला आरंभ केल्यावर त्याला आनंद व्हायचा. ‘प.पू. गुरुदेवांनी प्रसाद दिला आहे’, असे त्याला सांगितल्यावर तो आनंदाने खाऊ ग्रहण करायचा. नामजप करत खाऊ भरवल्यावर तो शांतपणे खायचा.’ – सौ. विशाखा विष्णुदास म्हात्रे
४. वय १ ते २ वर्षे
४ अ. ‘त्याचे खेळून झाल्यावर तो स्वतःहून खेळणी पिशवीत भरून ठेवतो. तो बाहेरून आल्यावर त्याच्या चपला कपाटात ठेवतो.’ – सौ. सुरभी सागर म्हात्रे
४ आ. सात्त्विकतेची ओढ
१. ‘राघव २ वर्षांचा असतांना मला प्रतिदिन सद्गुरूंची आरती करण्याची आठवण करायचा. आरती झाल्यावर तो आरती घ्यायचा आणि साष्टांग नमस्कार करायचा. नंतर त्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे प्रसाद मागायला सांगितले की, तो त्यांच्या छायाचित्रासमोर हात पुढे करून प्रसाद मागायचा आणि नंतर मला प्रसाद घ्यायला सांगायचा.
२. राघवला झोप आल्यावर त्याच्या कानात नामजप म्हटल्यावर तो लगेच झोपी जात असे.
३. एकदा मी त्याला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ दाखवत होते. तेव्हा भ्रमणभाषवर ‘श्रीमन्नारायण नारायण हरे हरे…’ हे भजन लावले होते. त्या वेळी त्याला पुष्कळ आनंद झाला होता.’
– सौ. विशाखा विष्णुदास म्हात्रे
५. वय ३ ते ४ वर्षे
५ अ. चुकांविषयीचे गांभीर्य
१. ‘राघव स्वतःच्या चुका सांगतो आणि क्षमायाचना करतो.
२. एकदा राघव आमच्या घरी आला असतांना मी त्याला सांगितले, ‘‘तू तुझ्या चुका कशा सांगतोस ?’, ते दाखव.’’ तेव्हा त्याने हात जोडून गांभीर्याने आणि नम्रतेने त्याच्या ८ – १० चुका सांगितल्या.’
– सौ. योगिता श्रीधर सावंत, खांदा कॉलनी, पनवेल.
५ आ. किल्ल्यावर गेल्यानंतर स्वयंस्फूर्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देणे : ‘एकदा आम्ही राघवला किल्ला दाखवण्यासाठी अलिबागला गेलो होतो. त्या वेळी राघव स्वयंस्फूर्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊ लागला. मी त्याला ‘तू असे का केले ?’, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जात होतो. त्यामुळे मला ‘त्यांच्या घोषणा द्यायला हव्यात’, असे वाटले.’’ – श्री. सागर म्हात्रे (कु. राघवचे वडील), खांदा कॉलनी, पनवेल.
५ इ. देवाची आवड : ‘एकदा आम्ही महडच्या गणपतीला गेलो होतो. तिथे मंदिराच्या बाहेर चप्पल काढतांना मी राघवला म्हणाले, ‘‘श्री गणेशाय नमः ।’, हा नामजप कर.’’ तेव्हा त्याने मोठ्या आवाजात नामजप करण्यास आरंभ केला. त्या वेळी रांगेत उभे असलेले सर्व भक्त त्याच्याकडे बघून नामजप करू लागले.
५ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीची ओढ
१. प्रतिदिन शाळेत जाण्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी तो सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या छायाचित्राला साष्टांग नमस्कार करतो.’
– सौ. विशाखा विष्णुदास म्हात्रे
२. ‘राघव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या ब्रह्मोत्सवाला गोवा येथे आला होता. तेव्हा त्याची भावजागृती होऊन त्याच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.’ – सौ. रेवती पेडणेकर (कु. राघवची आत्या)
५ उ. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता : ‘एकदा राघव लांजा (रत्नागिरी) येथे आलेला असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ तेथे आल्या होत्या. त्या वेळी राघवला त्यांच्याविषयी काही माहिती नसतांना त्याने त्यांना साष्टांग नमस्कार केला. काही दिवसांनी त्याने ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, या ग्रंथात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र पाहिले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘आजी, मी यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला होता. तेव्हा ‘माझ्या डोक्यात काहीतरी गेले’, असे मला वाटले.’’ – सौ. विशाखा विष्णुदास म्हात्रे
६. राघवमधील स्वभावदोष : ‘हट्टीपणा, चिडचिडेपणा, राग येणे, स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि चूक न स्वीकारणे’ – सौ. सुरभी सागर म्हात्रे
(सर्व सूत्रांचा मास : जून २०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
|