सरकारच्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी रुपयांचे प्रावधान !
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री – तीर्थदर्शन योजना’, युवकांना अनुदान, विद्यार्थिनींना पदवीपर्यंतचे विनामूल्य शिक्षण, द्रारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील महिलांना वर्षाला ३ विनामूल्य गॅस सिलिंडर, अशा विविध योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्याची प्रसिद्धी करण्यासाठी सरकारने २०० कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे.
जनसंपर्क महासंचालनालय, तसेच महिला आणि बालविकास विभाग ही प्रसिद्धी करेल. त्यासाठी ‘अॅनिमेशन’ लघुपट, व्हिडिओ, चित्रीत आणि ध्वनी स्वरूपात गाणी, कविता, चर्चासत्रे आदी माध्यमांतून ही प्रसिद्धी करण्यात येणार आहे. वर्तमानपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी, रेडिओ, टी.व्ही. वाहिन्या, चित्रपटगृहे, रेल्वे, बस, आगारे आणि रेल्वेस्थानके येथे ही प्रसिद्धी केली जाईल.