ISLAMIC BANGLASTHAN : ‘जमात-ए-इस्लामी’चा ‘इस्लामिक बांगलास्तान’ बनवण्याचे षड्यंत्र !

भारतातील संपूर्ण बंगाल, तसेच झारखंड आणि बिहार या राज्यांच्याा, तर नेपाळ अन् म्यानमार या देशांच्या काही भागांचा समावेश !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात हिंसाचार करणारी जमात-ए-इस्लामी ही जिहादी संघटना ‘इस्लामिक बांगलास्तान’, म्हणजे अखंड बांगलादेश बनवण्याचा कट रचत असल्याचे समोर आले आहे. बांगलादेशातील ‘बर्तमान’ या दैनिकाने या संदर्भातील एक वृत्त प्रसारित केले आहे. यात याविषयीची माहिती दिली आहे. या ‘इस्लामिक बांगलास्तान’मध्ये बांगलादेश, भारतातील संपूर्ण बंगाल राज्य, तसेच बिहार आणि झारखंड या राज्यांचा काही भाग, तर नेपाळ अन् म्यानमार या देशांचा काही भाग सामाविष्ट करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ‘जमात-ए-इस्लामी’ला ‘गझवा-ए-हिंद’चा (भारताचे इस्लामीकरण करण्याचा) उद्देश पूर्ण करायचा आहे. त्यासाठी या संघटनेचे लक्ष बांगलादेशाच्या सीमेवर असलेल्या भारताच्या राज्यांवर आहे. सामाजिक माध्यमांत ‘ग्रेट बांगलादेश’च्या नावाखाली काही नकाशे प्रसारित होत आहेत. यात बांगलादेशासमवेत बंगालसह भारताची काही राज्य आहेत.

भाजपचे नेते बाबूलाल मरांडी यांनी या वर्तमानपत्राचे वृत्त सामाजिक माध्यमांत प्रसारित करतांना ‘बांगलादेशातील परिस्थिती आणि धर्मांधांचा उद्देश झारखंडसह संपूर्ण देशासाठी अत्यंत संवेदनशील आहे. झारखंडमध्ये ज्या पद्धतीने अचानक बांगलादेशी मुसलमानांची संख्या वाढू लागली आहे, त्यावरून असे वाटते की, काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्षसुद्धा कट्टरतावाद्यांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी साथ देत आहे’, असे म्हटले आहे.

‘जमात-ए-इस्लामी’चा इतिहास !

वर्ष १९४१ मध्ये मौलाना अबुल अला मौदूदी यांनी या संघटनेची स्थापना केली. भारताच्या फाळणीनंतर जमात-ए-इस्लामीची वेगवेगळ्या गटांत विभागणी झाली. जमात-ए-इस्लामी बांगलादेश, तसेच जमात-ए-इस्लामी पाकिस्तान यांसारख्या वेगवेगळ्या संघटना बनल्या. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेशाच्या निर्मितीला जमात-ए-इस्लामीने विरोध केला होता. ही संघटना आजही पाकिस्तानची समर्थक म्हणून ओळखली जाते. या संघटनेला पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ची हस्तक म्हटले जाते.

संपादकीय भूमिका

भारताचे इस्लामीस्तान होण्यापूर्वी हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हावे !