Mohammed bin Salman : साऊदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान यांना भेडसावत आहे हत्येची भीती !

राजकुमार महंमद बिन सलमान

रियाध – साऊदी अरेबियाचे राजकुमार (क्राऊन प्रिन्स) महंमद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांना  स्वतःची हत्या होण्याची भीती भेडसावत आहे. ही स्वीकृती स्वतः महंमद बिन सलमान यांनी अमेरिकेच्या अधिकार्‍यांसमोर दिली. सलमान यांच्या मनात भीती आहे की, जर त्यांनी इस्रायल, अमेरिका आणि साऊदी अरेबिया यांच्यातील संभाव्य करारावर स्वाक्षरी केली, तर त्यांची हत्या केली जाऊ शकते.