मोरजी येथील नाईट पार्ट्यांचे फलक आगरवाडा-चोपडे पंचायतीच्या सरपंचांनी हटवले
पेडणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) – चोपडे येथे स्वैराचाराचे प्रदर्शन घडवणार्या नाईट पार्ट्यांचे फलक स्वेच्छा नोंद घेऊन आगरवाडा-चोपडे पंचायतीचे सरपंच सचिन राऊत यांनी हटवले आहेत. पंचायतीची अनुमती न घेता हे फलक लावल्याने सरपंच सचिन राऊत यांनी ही कारवाई केली. यामुळे राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून सरपंच सचिन राऊत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
याविषयी सरपंच सचिन राऊत म्हणाले, ‘‘स्थानिक पंचायतीला अंधारात ठेवून अशा प्रकारे पार्ट्यांचे विज्ञापन करणारे फलक चोपडे तिठ्यावर झळकणे, हा देशप्रेमी नागरिकांचा अवमान आहे. उपजिल्हाधिकार्यांनी संबंधितांवर कारवाई करावी.’’
संपादकीय भूमिकास्वैराचाराचे प्रदर्शन घडवणार्या नाईट पार्ट्यांचे फलक स्वेच्छा नोंद घेऊन हटवणारे आगरवाडा-चोपडे पंचायतीचे सरपंच सचिन राऊत यांचे अभिनंदन ! |