५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मदुराई (तमिळनाडू) येथील कु. ख्याती ब्रह्मानंद नायक (वय १६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. ख्याती ब्रह्मानंद नायक हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक)

कु. ख्याती नायक
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

कु. ख्याती ब्रह्मानंद नायक हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली  गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. लक्ष्मी ब्रह्मानंदा (कु. ख्यातीची आई)

१ अ. कुशाग्र बुद्धीमत्ता आणि आज्ञापालन करण्याची वृत्ती : ‘मे २०२० पासून कु. ख्यातीने तमिळ लिखाणाचे कन्नड भाषेत भाषांतर करण्याची सेवा करायला आरंभ केला. तिने ही सेवा चालू करण्यापूर्वी केवळ दोनच दिवस आधी मी ख्यातीला कन्नड भाषा शिकून घेण्याविषयी सुचवले होते. त्याप्रमाणे तिने ही सेवा शिकण्याची सिद्धता दर्शवून ती शिकण्यास आरंभ केला. तिच्यासाठी कन्नड भाषा संपूर्णपणे नवीन असून आणि तिने शिकण्यासाठी प्रतिदिन केवळ अर्धाच घंटा देऊनही ती अवघ्या २ दिवसांत कन्नड लिखाण वाचायला शिकली. तिची ही प्रगती पाहून मी विस्मयचकीत झाले. केवळ गुरुकृपेमुळेच ख्यातीला अल्पावधीतच एक नवीन भाषा आत्मसात् करता आली. माझ्या बहिणीने कन्नड भाषेत भावजागृतीचा प्रयोग घेण्यास आरंभ केल्यावर गुरुदेवांचे ख्यातीला कन्नड भाषा शिकवण्याचे नियोजन माझ्या लक्षात आले आणि माझी भावजागृती झाली.

१ आ. गुरुकृपेने ख्यातीने कन्नड भाषेतील भावजागृतीच्या प्रयोगाच्या लिखाणाचे तमिळ भाषेत भाषांतर करण्याची सेवा चालू केली.

१ इ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : ती नियमित स्वतःकडून झालेल्या चुका लिहिते, तसेच तिच्याकडून प्रतिदिन होत असलेल्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांचा आढावा उत्तरदायी साधकांना देते.’

१. ई. नियमितपणा : ‘दोन वर्षांपूर्वी मी आमच्या कुलदेवीच्या देवस्थानी गेले होते. तिथे त्यांनी मला प्रत्येक रविवारी आणि बुधवारी लावण्यासाठी विभूती दिली होती. तेव्हापासून कु. ख्याती आठवणीने आणि नियमितपणे प्रत्येक रविवारी अन् बुधवारी विभूती लावते अन् आम्हालाही लावायची आठवण करून देते.

२. घरकामात साहाय्य करणे : ख्याती न सांगता घरकामात साहाय्य करते. माझी प्रकृती बरी नसेल, तेव्हा ख्याती घरातील कामे करते.

३. इतरांची काळजी घेणे : घरी कुणाची प्रकृती बरी नसल्यास ती तिला ठाऊक असलेली घरगुती औषधे करून देते, उदा. तिच्या वडिलांना सर्दी-खोकला झाल्यावर तिने मिरेपूड घेऊन त्यात मध घालून त्याचे चाटण करून दिले. तिने त्यांना तुळशी आणि ओवा यांची पाने अन् मिरी घालून कशाय करून दिला.

४. मायेची ओढ नसणे : ती कुठेही समारंभाला जातांना साधेपणे सिद्ध होते. तिच्या वाढदिवसालाही ती ‘नवीन कपडे हवेत’, असे म्हणत नाही. ती तिला आवश्यक असलेल्या वस्तूही मागत नाही.

५. प्रेमभाव : ती घरी आणि शाळेत सर्वांशी प्रेमाने वागते. तिला शाळेत कुणीही काहीही साहाय्य मागितल्यावर ती तत्परतेने साहाय्य करते. कुणी तिची पुस्तके मागितली, तरी ती लगेच देते.

६. चुकांचे गांभीर्य

अ. ती चुकांची सारणी (टीप) नियमित लिहिते. एखाद्या दिवशी तिची सारणी लिहून झाली नसेल, तर ती रात्री जागून किंवा सकाळी उठल्यावर आधी सारणी लिखाण करते.

(टीप – स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्यापुढे ‘त्या कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या ?’, ते लिहिणे आणि त्यापुढे योग्य कृती किंवा दृष्टीकोन लिहिणे.)

आ. मी तिला तिची चूक सांगितल्यावर किंवा तिची चूक तिच्या लक्षात आल्यावर ती लगेच गुरुदेवांची आणि माझी कान पकडून क्षमा मागते.

इ. शाळेतील अन्य मुले किंवा तिच्या मैत्रिणी शिक्षकांविषयी चुकीचे बोलतात किंवा काही वेळा चुकीच्या कृती करतात. तेव्हा ती त्यांना त्यांच्या चुका सांगते.

७. भाव

७ अ. शाळेत ठेवत असलेला भाव : ती शाळेत शिकवणारे शिक्षक म्हणजे ‘साक्षात् सरस्वतीदेवीच आहे’, असा भाव ठेवते. तिला शिक्षकांनी शिक्षा केली, तर ‘देवीनेच माझी चूक दाखवली’, असा भाव ठेवते.

७ आ. ती ‘श्रीकृष्ण माझ्या समवेत सतत आहे’, असा भाव ठेवते.

७. इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती असलेला भाव : ख्याती ‘गुरुदेवांची पाद्यपूजा करणे, क्षमायाचना करणे, गुरुदेवांचे चित्र असलेले ‘सनातन प्रभात’चे विशेषांक झोपतांना डोक्याजवळ ठेवणे, अशा कृती करते. ती सकाळी उठल्यावर गुरुदेवांच्या छायाचित्राशी बोलते.

८ . कु. ख्यातीला आलेल्या अनुभूती

८ अ. कांचीपूरम् येथील सनातनच्या नूतन सेवाकेंद्राची जागा पहातांना देवीच्या विशाल रूपाचे दर्शन होणे : ‘२०.५.२०२४ या दिवशी आम्ही कांचीपूरम् येथे गेलो होतो. तिथे आम्हाला सनातनच्या नूतन सेवाकेंद्राची जागा पहायची संधी मिळाली. ती जागा अजून पूर्ण रिकामी हाेती, तरी ती जागा पहातांना ख्यातीला ‘हे देवीचे स्थान आहे’, असे वाटले. काही वेळातच तिला तिथे साक्षात् देवीचे रूप दिसले. ‘देवी संपूर्ण ब्रह्मांडाचे विशाल रूप धारण करून आली आहे’, असे तिला वाटले. तिच्याकडे पहातांना तिचे शरीर रोमांचित झाले आणि तिला भावाश्रू आले.

८ आ. जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहातांना उजव्या हातावर दैवी कण येणे : ९.६.२०२४ या दिवशी गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त वर्ष २०२३ च्या ब्रह्मोत्सवाचा दाखवण्यात आलेला कार्यक्रम पहातांना तिची पुष्कळ भावजागृती होत होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी उजव्या हातावर दैवी कण दिसले. ते मोठे प्रकाशमान आणि स्पष्ट दिसत होते. कार्यक्रम संपत आल्यावर त्यांचा आकार लहान झाला.

९ . स्वभावदोष : वेळेचे नियोजन न करणे.

‘हे गुरुदेवा, तुम्हीच ख्यातीची साधनेत शीघ्र गतीने प्रगती करून घ्यावी’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. लक्ष्मी ब्रह्मानंद नायक (ख्यातीची आई), मदुराई, तामिळनाडू. (१४.५.२०२४)

२ . श्री. पवनकुमार, शिवमोग्गा, कर्नाटक.

२ अ. शिकण्याची वृत्ती : ‘कु. ख्यातीची शिकण्याची तळमळ पुष्कळ आहे, तसेच तिच्यात नवीन सूत्रे शिकण्यासाठी आवश्यक असणारा संयमही आहे. ख्यातीने जिज्ञासेने प्रश्न विचारायला आरंभ केल्यावर त्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यासाठी मी त्या विषयांचा अभ्यास करायला आरंभ केला. तिने ‘फोटो एडिटिंग’ सेवा (टीप) केवळ ३ दिवसांत आत्मसात् केली. मला ही सेवा शिकण्यासाठी अनेक दिवस लागले; मात्र ख्यातीने अल्प कालावधीत सर्व सूत्रे शिकून घेतली. मी तिला थोडेच शिकवले आहे; परंतु मी तिच्याकडून जे शिकलो, ते पुष्कळ आहे. तिला लहान वयातही एवढी माहिती असलेली पाहून ‘ज्ञान मिळवण्यासाठी वयाचे बंधन नसते’, हे सूत्र मला शिकायला मिळाले. तिला शिकवत असतांना मला गुरूंप्रती अखंड कृतज्ञताभाव अनुभवता आला. (टीप – ‘फोटो एडिटिंग’ सेवा – छायाचित्रात सुधारणा करण्याची सेवा)

२ आ. साधनेची आवड : ख्याती नेहमी साधनेविषयीच बोलत असते. मला तिच्या बोलण्यात प्रीती जाणवते.

२ इ. ख्यातीचे निसर्गावर असणारे प्रेम कौतुकास्पद आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १४.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.