पुणे येथे गणेशोत्सव काळात १० दिवस मद्यबंदी करावी !
गणेशोत्सव मंडळांची मागणी
पुणे – ढोलताशांचा गजर, मधुर सूर, पारंपरिक वाद्यांचा नाद, विविध पोषाखांत सजलेली तरुणाई आणि चहूबाजूंनी होणारा ‘गणपति बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेशोत्सव साजरा होत असतो.
या गणेशोत्सव काळात १० दिवस मद्यबंदी करण्यात यावी, अशी मागणी पुणे येथील गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. त्यावर जनभावना काय आहे ? याचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांच्या बैठकीमध्ये सांगितले.